Desh

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी सर्वोच्च स्थानी

By PCB Author

October 04, 2018

नवी दिल्ली, दि.४ (पीसीबी) – भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांनी सलग अकराव्या वर्षी आपले स्थान अबाधित राखले आहे. फोर्ब्जने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत ४७.३ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीचे धनी असलेल्या अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला असून एका वर्षात सर्वात जास्त संपत्ती मिळवणाऱ्या व्यक्तिंच्या यादीतही मुकेश अंबानी सर्वोच्च स्थानी आहेत. 

रिलायन्स जिओ आणि ब्रॉडबॅन्डच्या यशामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वर्षभरात ९.३ अब्ज डॉलर म्हणजेच ६८,६१० कोटींची वाढ झाली आहे. तसेच श्रीमंतांच्या यादीत विप्रोचे अध्यक्ष अजिम प्रेमजी हे यादीत दुस-या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २१०० अब्ज डॉलर इतकी आहे. तर या यादीत तिसऱ्या स्थानावर आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल हे असून त्यांची संपत्ती १८.३ अब्ज डॉलर इतकी आहे