भारतातील एकमेव महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली ‘मुख्यमंत्री’पदाची शपथ

0
220

बंगाल, दि.०५ (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने दणदणीत विजय मिळवला आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत त्या सलग तिसऱ्या वर्षी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती अगदी काही लोकांच्याच उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडत आहे.

आपलं प्राधान्य करोनाविरुद्धचा लढा हेच असेल असं म्हणत ममता यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेणार आहेत. ममता बॅनर्जी या भारतातल्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. ममता यांनी लवकरात लवकर हा हिंसाचार थांबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.