भारताच्या हद्दीत घुसलेले पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले  

0
569

श्रीनगर, दि. २७ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान पाडल्याची वृत्त समोर आले आहे. आज (बुधवार) सकाळी पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दी घुसली होती. त्यानंतर भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली.

भारतीय हवाई दलांनी  पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भेदरलेल्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी आज (बुधवार) भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्ब टाकल्याची माहिती मिळत आहे.

जम्मू काश्मीरच्या राजौरी परिसरात पाकिस्तानची किमान तीन विमाने भारतीय हवाई हद्दी घुसल्याचे  सांगितले जात आहे. मात्र,  भारतीय हवाई दलांनी चोख प्रत्युत्तर देत एक विमान पाडले. याबाबत  भारत सरकार आणि वायुसेनेकडून कोणतीही अधिकृत माहिती  देण्यात आलेली नाही.