भारताचे आयात शुल्क धोरण रद्द झालेच पाहिजे; ट्रम्प यांची आगपाखड

0
491

वॉश्गिंटन, दि. २७ (पीसीबी) – भारताच्या आयात वस्तूसंबंधी धोरणावर सतत आगपाखड करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आकारत असलेल्या आयात शुल्काला पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शवला आहे. आमचा विरोध असताना भारताने पुन्हा आयात शुल्कात वाढ केली, हे स्वीकारण्याजोगे नसून हे धोरण रद्द व्हायलाच हवे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या साठी आपण भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भारताच्या आयात शुल्क धोरणाबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत अमेरिकेवर मोठे आयात शुल्क आकारत आला आहे. काही दिवसांपूर्वी भारताने पुन्हा आयात शुल्कात वाढच केल्याचे दिसत आहे. या बाबत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण बोलणार असल्याचे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भारताचे आयात शुल्काबाबतचे धोरण मुळीच स्वीकारार्ह नसून ते रद्द केलेच पाहिजे अशी ठाम भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.