भारताचा वैमानिक समजून पाकिस्तानच्या नागरिकांनी आपल्याच वैमानिकाला केले ठार  

0
679

इस्लामाबाद, दि. २ (पीसीबी) – भारत आणि पाकिस्तानची लढाऊ विमाने २७ फेब्रुवारीच्या सकाळी समोरासमोर आली होती. यावेळी भारताचे आणि पाकिस्तानचे विमान खाली कोसळले. दोन्ही विमानातील जवान पॅराशूटच्या सहाय्याने सुखरुप खाली उतरले होते.  मात्र दोघांच्या नशिबात शेवट वेगळा होता. पाकिस्तानने ताब्यात घेतलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुखरुप भारतात परतले. मात्र, पाकिस्तानी वैमानिकाला पाकिस्तानी जनतेने भारतीय समजून आपल्याचा वैमानिकाला ठार मारले.

पाकिस्तानी हवाई दलाचे वैमानिक शाहनाज एफ १६ विमानाचे उड्डाण करत होते. भारतीय विमानाने यावेळी एफ १६ विमानाचा वेध घेतला होता. यानंतर शाहनाज यांनी पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये  उतरले  होते.

त्यावेळी शाहनाज सुखरुप खाली उतरण्याआधीच जखमी झाले होते. त्यांचा गणवेश फाटला होता. यावेळी तेथील लोकांना हा भारतीय वैमानिक असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शाहनाज यांचा मृत्यू झाला.