भामाआसखेड धरणातून चाकणला पाणी मिळणार; आमदार सुरेश गोरे यांच्या पाठपुरव्याला यश

0
504

चाकण, दि. १० (पीसीबी) – चाकण शहरासाठी भामाआसखेड धरणातून पिण्याच्या पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तवाला जलसंपदाविभागाकडून मंजूरी मिळाली. याकामी आमदार सुरेश गोरे व नगराध्यक्ष शेखर घोगरे उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे यांनी पाठपुरवा केला होता. त्यास यश मिळाले आहे.

चाकण शहरासाठी भामा आसखेड धरण प्रकल्पातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क (BULK WATER ENTITLEMENT) प्रस्तावास मंजुरी मिळवली.  यामुळे भामाआसखेड धरणातून  पिण्याचे पाणी आरक्षित ठेवन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे चाकणकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

जगाच्या नकाशावर कात टाकणारे चाकण करांसाठी आता पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे यासाठी आमदार सुरेशभाऊ गोरे व नगराध्यक्ष शेखर घोगरे उपनगराध्यक्षप्रकाश गोरे  तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका चाकण नगरपरिषद याच्या पाठपुराव्याला यश आहे.