भाजयुमोतर्फे वारकऱ्यांना खराळवाडी आणि दिघीतील मॅगझीन चौकात रेनकोटचे वाटप

0
530

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना रेनकोट आणि खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. तसेच पालखी मार्गावर स्वच्छता अभियान राबवून बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाचा प्रचार व प्रसार  करण्यात आला.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना खराळवाडी येथे, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दिघीतील मॅगझीन चौकात रेनकोट आणि खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपा प्रदेश चिटणीस उमा खापरे, भाजयुमोचे शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सांस्कृतिक आघाडी शहराध्यक्ष धनंजय शाळीग्राम, भाजयुमो पदाधिकारी अजित कुलथे, अमित गुप्ता, सचिन राऊत, अजय भोसले, मंगेश धाडगे, दिपक नागरगोजे, पंकज शर्मा, मधुकर बच्चे, भुषण पाटील, पंकज वेंगुर्लेकर, राहुल शिंदे, सोनल वर्मा, सुमित घाटे, पराग जोशी, गणेश संभेराव, पंकज वेंगुर्लेकर, महेश कंद, गोपाल मंडल, ऋतिक चव्हाण, अमित देशमुख, सत्पाल गोयल, इंद्रमल कुसवाह, शरद फुगे, संग्राम गुळवे आदी उपस्थित होते.