भाजप सर्वात मोठा पक्ष असेल, मात्र मोदी पंतप्रधान नसतील – शरद पवार

0
690

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे, असे  मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

भाजपला  सर्वाधिक जागा मिळू शकतात. मात्र, त्यांना बहुमतासाठी लागणारा आकडा गाठता येणार नाही.  त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना दुसऱ्या पक्षांवर अवलंबून राहवे लागणार आहे.  परंतु आघाडी करण्यासाठी मोदींना स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे  मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असेही भाकित पवारांनी वर्तवले आहे.

माझ्या  राजकीय कारकीर्दीला ५२ वर्षे झाली आहेत.  राजकारणातून बाहेर पडण्याचा कधी तरी विचार करायला हवा, म्हणून मी निवडणुकीतून माघार घेतली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी कधी ना कधी हरले, पण मी कधीच हरलो नाही. त्यामुळे पराभवाच्या भीतीने मी माघार घेतल्याचे भाजपचे विधान बालिशपणाचे आहे, असे उत्तर पवारांनी विरोधकांना दिले.