भाजप सरकारने देशातील राजांना भीक मागायला लावली – खासदार उद्यनराजे

0
539

सातारा, दि. २१ (पीसीबी) – भाजप सरकारने देशातील राजांना भीक मागायला लावली, त्यांच्या हातात पाच वर्षात  वाडगं दिले, अशी टीका  खासदार  उदयनराजे भोसले यांनी शिवसेना-भाजप सरकारवर  केली. सातारा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

या सरकारने देशातील राजांना भीक मागायला लावली. त्यांच्या हातात पाच वर्षात वाडगं दिले. गरिबांचे उदरनिर्वाहाचे साधनसुद्धा हिरावून घेतले. तसेच निवडणुका लागल्या की यांच्याकडे भरभरुन पैसे असतात. आमच्या गाड्या चेक केल्या तर शिळ्या भाकरी मिळतील. परंतू तुम्हाला ज्या गाडीवर कमळ दिसेल, त्या गाडीत मी तुम्हाला पैसे शोधुन देतो, असेही उदयनराजे म्हणाले.

मुक मोर्चाला ‘मूका मोर्चा’ म्हणणाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. ही तुमची संस्कृती आहे का?’ असा सवाल उदयनराजेंनी शिवसेनेला केला. उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचीही खिल्ली उडवली.  लोकांसमोर जाताना आती ही लोक लटलट कापत आहेत. भाषण करताना डायसचा आधार नसेल तर ते खाली पडतील, असा टोला  उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांना  लगावला.