भाजप सरकारकडून अनेक चुका झाल्या महाविकास आघाडीला दुरुस्त कराव्या लागतील

0
275

कोल्हापूर, दि.१५ (पीसीबी) – काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ५६ वे राज्यव्यापी वार्षिक अधिवेशन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली येथे पार पाडले. या अधिवेशनाचे उद्घाटन खासदार पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. पवार बोलत होते.

पवार म्हणाले, गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारकडून अनेक चुका झाल्या आहेत. त्या महाविकास आघाडीला दुरुस्त कराव्या लागतील. एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मान्यताप्राप्त संघटनेला विश्वासात घेऊन सोडवावे लागतील. त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जबाबदारी घ्यावी,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ‘कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे वर्ग करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनावरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपले अधिकार वापरत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतला. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.