भाजप-शिवसेनेकडून कार्यकर्ता समन्वयासाठी मतदारसंघनिहाय या पदाधिकाऱ्यांची झाली निवड

0
356

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमधील समन्वयासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. हे पदाधिकारी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम करतील. मतदारसंघ – सिंधूदुर्ग-रत्नागिरी, रायगड, मावळ (रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा), समन्वय पदाधिकारी – सुभाष देसाई (शिवसेना), रविंद्र चव्हाण (भाजप). मतदारसंघ – पुणे, बारामती, शिरूर, सोलापूर, माढा, मावळ (पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा), समन्वय पदाधिकारी – डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), गिरीश बापट (भाजप).