भाजप-शिवसेनेकडून कार्यकर्ता समन्वयासाठी मतदारसंघनिहाय या पदाधिकाऱ्यांची झाली निवड

0
537

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमधील समन्वयासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. हे पदाधिकारी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम करतील.

मतदारसंघ – सिंधूदुर्ग-रत्नागिरी, रायगड, मावळ (रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा)

समन्वय पदाधिकारी – सुभाष देसाई (शिवसेना), रविंद्र चव्हाण (भाजप).

मतदारसंघ – पुणे, बारामती, शिरूर, सोलापूर, माढा, मावळ (पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा)

समन्वय पदाधिकारी – डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), गिरीश बापट (भाजप).

मतदारसंघ – कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडी.

समन्वय पदाधिकारी – एकनाथ शिंदे (शिवसेना), रवींद्र चव्हाण (भाजप).

मतदारसंघ – सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले

समन्वय पदाधिकारी – नितीन बानगुडे-पाटील (शिवसेना), चंद्रकांत पाटील (भाजप).

मतदारसंघ – नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगांव, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी.

समन्वय पदाधिकारी – दादा भुसे (शिवसेना), गिरीश महाजन (भाजप).

मतदारसंघ – हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद.

समन्वय पदाधिकारी – अर्जुन खोतकर (शिवसेना). पंकजा मुंडे (भाजप).

मतदारसंघ – बुलडाणा, अकोला, वाशिम-यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भांडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, रामटेक.

समन्वय पदाधिकारी – दिपक सावंत (शिवसेना), चंद्रशेखर बावनकुळे (भाजप).