भाजप व जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवारी पिंपरीत मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन

0
606

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष व जिजाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि. २०) पिंपरीमध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी कॉलनीतील आयप्पा मंदिराजवळील बी. टी. आडवणी हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे, अशी माहिती जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका तथा भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.