भाजप युवती आघाडीच्या सरचिटणीसपदी निगडीतील सायली शहाणे यांची निवड

707

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष युवती आघाडीच्या सरचिटणीसपदी निगडी येथील सायली शहाणे यांची निवड करण्यात आली आहे.

पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणीक आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते सायली शहाणे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी युवती आघाडीच्या शहराध्यक्षा तेजस्वीनी कदम उपस्थित होत्या.