भाजप – मनसे एकत्र येऊ शकतात; चंद्रकांत पाटलांनी दिले युतीचे संकेत

0
264

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप-मनसे या संभाव्य युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला मनसेच्या अधिवेशनाबाबत आणि मनसेच्या नवीन झेंड्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली

बोलताना पाटील म्हणाले, ‘मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली याचे स्वागत आहे. पण परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणे हे भाजपला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला पाहिजे. हिंदुत्व व्यापक संकल्पना आहे. परप्रांतियांबाबत जर भूमिका बदलली तर भाजप मनसे एकत्र येऊ शकतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.