Desh

भाजप पक्षातून विश्वास आणि वचनबद्धता सारखे शब्द संपले; पर्रीकर यांच्या मुलाची भाजपवर टीका

By PCB Author

July 11, 2019

पणजी, दि. ११ (पीसीबी) – गोव्यात काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपात प्रवेश करण्यावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर पक्षाने दुसरा मार्ग स्विकारला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपा पक्षातून आता विश्वास आणि वचनबद्धता सारखे शब्द संपले आहेत अशी टीका उत्पल पर्रीकर यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्पल पर्रीकर यांनी म्हटले आहे की, “माझे वडील जिवंत असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता सारख्या शब्दांना महत्त्व होते. ही पक्षाची मुल्य होती. पण १७ मार्चनंतर दोन्ही शब्द पक्षातून गायब झाले आहेत. १७ मार्चनंतर पक्षाने भलतीच दिशा पकडली आहे. आता काय योग्य आहे हे वेळच सांगेल ?”. १७ मार्च रोजी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेता मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले.

गोवा विधानसभेत काँग्रेसचे १५ आमदार आहेत. यामधील १० आमदार बुधवारी भाजपात सहभागी झाले. त्यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली.