Notifications

भाजप खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्कवितर्कांना उधाण

By PCB Author

December 12, 2018

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान,  संजय काकडे यांनी वाढदिवसानिमित्त पवारांना शुभेच्छा  देण्यासाठी भेट घेतल्याचे  सांगितले जात आहे. तर  पवारांच्या गाडीत बसून काकडे यांनी  प्रवास केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.