Desh

भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंहच्या पार्थिवाला दिला स्मृती इराणींनी खांदा

By PCB Author

May 26, 2019

अमेठी, दि. २६ (पीसीबी) – अमेठीच्या भाजप  खासदार स्मृती इराणी  आपले  निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रविवारी दिल्लीहून अमेठीत दाखल झाल्या. भावूक झालेल्या स्मृती यांनी सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. सिंह यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेदरम्यान राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारही उपस्थित होते. सुरेंद्र यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या राजकीय वादातून झाली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सिंह यांचा मुलगा अभय म्हणाला, ‘स्मृती इराणी यांच्या विजयानंतर आम्ही जल्लोष करत होतो, ते अनेक काँग्रेस समर्थकांना आवडलेले नाही.

दरम्यान सिंह शनिवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी सुरेंद्र सिंह यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडून  हत्या केली.   या हत्येनंतर खळबळ उडाली आहे.