भाजप कार्यकर्ते आक्रमक: ‘CPM’ च कार्यालय पेटवून गाड्या…

0
519

त्रिपुरा, दि.०९ (पीसीबी) : त्रिपुरामधील सेफाहिजाला जिल्ह्यामधील दोन गावांमध्ये दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टी आणि विरोधी पक्ष म्हणजेच सीपीएमच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर आज पुन्हा या जिल्ह्यात चार ठिकाणी नव्याने संघर्ष उफाळून आलाय. अगरताळामध्येही बुधवारी रात्री हिंसा झाल्याची माहिती समोर येत आहे. या संघर्षामध्ये १० जण जखमी झाले असून सीपीएमच्या दोन कार्यालयांना आग लागवण्यात आलीय. तसेच किमान सहा गाड्या जाळल्या आहेत. राज्यामधील सीपीएमच्या मुख्य कार्यालयावरही हल्ला करण्यात आल्याचं पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

गोमती जिल्ह्यातील उदयपूर, सेफाहिजालामधील विशालगडबरोबरच हपनाई आणि अगरतळामधील मेलारमठ भागांमध्ये बुधवारी रात्री हिंसा घडली. सीपीएमचे राज्यामधील मुख्य कार्यालय अगरतळामध्ये आहे. या कार्यालयाबरोबरच पक्षाचे जिल्ह्याचे मुख्य कार्यालयाचीही या हिंसेमध्ये नासधूस करण्यात आलीय. पोलिसांनी हिंसाचार रोखण्यासाठी लाठीचार्ज केला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसाचारानंतर दोन्ही पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोप केले. विरोधी पक्षाने हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप हे दोन्ही पक्ष एकमेकांवर करत आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी प्राथमिक गुन्ह्यांची नोंद करुन घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. “या प्रकरणाचा संपूर्ण तपास बाकी आहे. तीन चारचाकी गाड्या आणि काही मोटरसायकल अशा जवळजवळ सहा गाड्या अगरतळामध्ये जाळण्यात आल्यात,” असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. “विशालगड, हपनाईमधील पक्षाची कार्यालये जाळण्यात आली असून उदयपूरमधील कार्यालायावरही हल्ला करण्यात आलाय. या ठिकाणी माफिज मिह नावाचा तरुण जखमी झालाय. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आलीय,” असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

या हिंसेदरम्यान स्थानिक वृत्तपत्र अशणाऱ्या प्रातीबाडी कलम आणि सीपीएमचे मुखपत्र असणाऱ्या दिशेर कथा तसेच पीबी २४ या स्थानिक वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सीपीएमने केलेल्या आरोपानुसार त्यांचे कार्यकर्ते उदयपूरमध्ये रस्तारोको आंदोलन करत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सीपीएमच्या रिकाम्या कार्यालयाच्या इमारतीवर हल्ला केला. तेथे नासधूस करुन भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयाला आग लावल्याचाही आरोप सीपीएमने केलाय.

पत्रकार परिषदेमध्ये त्रिपुरा लेफ्ट फ्रण्टचे नेते बीजन धार यांनी, “आम्ही विशालगड येथे पक्षाची बैठक घेतली. आम्ही परत येत असताना भाजपा कार्यकर्त्यांनी बुल्डोझरने आमच्या ऑफिसवर हल्ला केल्याचं आणि कार्यालयाचं पुढील गेट तोडल्याचं समजलं. तसेच त्यांनी काही दरवाजे तोडून कार्यालायला आग लावल्याची माहिती मिळाली. तसेच आमचे नेते पर्था प्रतीम मुझूमदार यांच्या घरालाही आग लावण्यात आली,” असा दावा केलाय.