भाजप आमदार राम कदमांचा महिला आयोगाकडे बिनशर्त माफीनामा

0
715

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात महिलाविषयी वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांनी आपल्या विधानासाठी राज्य महिला आयोगाकडे बिनशर्त माफी मागितली आहे. याबाबत राम कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला खुलासा पाठवला आहे. भविष्यात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा त्यांनी शब्द दिला आहे.

राम कदम यांनी पाठवलेल्या या माफीनाम्यावर कायदेशीर सल्ला घेऊ, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे. राज्य महिला आयोगाने कदम यांच्या विधानाची दखल घेत त्यांना ५ सप्टेंबर रोजी नोटीस बजावून आठ दिवसात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते.

घाटकोपर येथे राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात गोविंदांसमोर बोलताना त्यांनी ‘एखादी मुलगी पसंत असेल, तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’ असे वादग्रस्त     विधान केले होते.