भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी तोंड सांभाळून बोलावे-जोगेंद्र कवाडे

0
1542

पुणे, दि. १४ (पीसीबी) – देशाचे नेतृत्व ब्राह्मण करतील असे विधान करणाऱ्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी तोंड सांभाळून बोलावे, असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे चे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले.

देशाचे नेतृत्व ब्राह्मणच करतील, असे विधान पुण्यातील आमदार मेधा कुलकर्णी यांनी ब्राम्हण महासंघाच्या कार्यक्रमात गेल्या महिन्यात  केले होते. या विधानाचा कवाडे यांनी खरपूस समाचार घेतला.

कवाडे म्हणाले की, देशातील जनता ब्राम्हण समाजाची गुलाम असावी, अशी मानसिकता मेधा कुलकर्णी यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे.  न्यायालयाने केरळ येथील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशला परवानगी दिली आहे. त्यास दुसऱ्या बाजूने विरोध होत आहे. यावर मेधा कुलकर्णी बोलत नाही, असेही ते म्हणाले.