Maharashtra

भाजप आमदार बाळा काशीवार यांची आमदारकी रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय

By PCB Author

November 01, 2018

भंडारा, दि. १ (पीसीबी) – भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळा काशीवार यांचे पद रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. आमदार काशीवार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडवून ठेवल्याचे सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

काशीवार यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार सेवक वाघाये यांनी नागपूर खंडीपाठात याचिका दाखल केली होती. काशीवार हे शासकीय ठेकेदार आहेत. विधानसभेची निवडणूक लढवताना त्याबाबत निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती देणे बंधनकारक होते. परंतु, काशीवार यांनी ही माहिती लपविली. त्यामुळे माजी आमदार सेवक वाघाये यांनी न्यायालयात धाव घेतली.

वाघाये यांच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत आमदार काशीवार यांनी शासकीय ठेकेदार असल्याची माहिती लपवल्याचे पुराव्यासह सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने आमदार काशीवार यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिला. नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार काशीवार यांनी सांगितले.