भाजप आमदार गीता जैन यांना कोरोना भाजपच्या दुसऱ्या आमदार कोरोना बाधित

0
218

मिरा भाईंदर, दि. २ (पीसीबी) : मिरा भाईंदरच्या भाजप आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार गीता जैन यांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. आमदार गीता जैन यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्या घरी आमदार गीता जैन आणि त्याचे पती दोघेच जण आहेत, अशी माहिती त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली.
रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मिरा भाईंदर शहरात कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. मिरा भाईंदर शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. संध्याकाळी 5 पासून कडक लॉकडाऊनची सुरुवात झाली आहे. 10 जुलैपर्यंत मिरा भाईंदरमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची सर्व दुकानेही बंद राहणार आहे. नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत.

मंत्री, आमदारांना कोरोना
राज्यात यापूर्वी अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्या एका आमदाराला कोरोना झाल्याचं निष्पण्ण झालं. भोसरी मतदारसंघातील भाजप आमदार महेश लांडगे हे पत्नी व कुटुबातील आठ सदस्यांसह कोरोना बाझित झाले.