भाजप आमदाराची गुंडगिरी; पालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

0
485

इंदूर, दि. २६ (पीसीबी) – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आणि भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी गुंडगिरीचा कळस गाठलाय. इंदूरमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्याला आकाश यांनी चक्क क्रिकेटच्या बॅटने मारहाण केलीय. आकाश यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इंदूरमध्ये पालिकेचे अधिकारी एका जर्जर घराचे तोडकाम करण्यासाठी आले होते. त्यावेळी भाजप आमदार आकाश विजयवर्गीय तिथे पोहोचले आणि त्यांच्यात वाद झाला. परंतू हा वाद एवढा विकोपाला गेला की, क्रिकेटची बॅट थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांवर उचलून मारहाण केली आहे. एवढेच नव्हे तर आकाश यांच्या समर्थकांनी पालिकेच्या अधिकार्यांनाही मारहाण केली.

या भागात जोरदार पाऊस पडणार असल्याच्या सूचना पालिकेच्यावतीने देण्यात आले होते. अशातच पालिकेच्या वतीने जीर्ण घरे खाली करण्यात येते होती.

भाजप आमदार आकाश विजयवर्गीय हे याआधीही आपल्या वादग्रस्त विधानांवरुन चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त शब्द वापरले होते. त्यावेळी आकाश यांनी ‘राहुल गांधी पहले तो पप्पू थे, लेकिन अब गधों के सरताज बन गए हैं’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.