भाजप आणि शिवसेना पुढेही एकत्रित लढणार; भाजपाध्यक्ष अमित शहा

0
297

जालना, दि. १९ (पीसीबी) – इतर मागासवर्गीय समाजाच्या आयोगाला वैधानिक दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या ओबीसींना काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत कोणी विचारले नाही. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ओबीसींच्या मागास आयोगाला वैधानिक दर्जा दिला आहे. सवर्ण समाजातील अर्थिंकदृष्ट्या दुर्बल मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण आम्ही दिले आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुरुवारी जालन्यातील जाहीर सभेत सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडाला सध्या पाणी सुटले आहे. त्यांना वाटते पुढे काय होणार? तर मी सांगतो पुढे देखील भाजप, शिवसेनेची युती एकत्रित लढणार आहे. त्यामुळे आपल्याला खूष होण्याची गरज नाही, या शब्दांत त्यांनी शरद पवारांच्या मनसुब्याला उत्तर दिले.