Chinchwad

भाजपा सदस्यांच्या तोडफोडीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी नगरसेवक हेल्मेट घालून सभागृहात

By PCB Author

December 16, 2020

 

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभेत भाजपच्या दोन गटांतील मतभेद उफाळून आला आणि त्या वादात तोडफोड झाली. वाकड मधील रस्ते प्रकरणावरून ही सभा गाजली होती. खबरदारी म्हणून आज स्थायी समिती सभागृहात प्रवेश कऱण्यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वसंरक्षणासाठी चक्क हेल्मेट परिधान केले होते.

वाकड परिसरातील रस्ते प्रकऱणातून हा राडा झाला होता. प्रत्यक्षात बोगस एफडीआर प्रकरणावरून जाब विचारल्याचे, असे आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी पत्रकारांनी सांगितले. त्यानंतर अनेकांनी या राड्याचे तर्क वितर्क लावले. मागील तहकूब झालेली स्थायीची बैठक बुधवारी (दि.१६) घेण्यात आली. यावेळी सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हेल्मेट घालून एंट्री केली. त्यावर अनेकांनी भुवया उंचावतल्या. राडा करणारे भाजपचे पण हेल्मेट घातले शिवसेना व राष्ट्रवादी नगरसेवकांनी याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिकेत या विषयावर कुजबूज सुरु होती. शिवसेना सदस्य राहूल कलाटे, राष्ट्रवादीच्या सदस्य सुलक्षणा शीलवंत-धर, पौर्णिमा सोनावणे यांनी हेल्मेट घालून एंट्री केली.

गेल्या आठवड्यातील स्थायी समिती बैठकीत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी आयुक्तांना खुलासा विचारत सभेत मोठा राडा केला होता. भाजपच्याच सदस्यांनी सभापतींच्या कारभारावरून आक्षेप घेतला आणि थेट टक्केवारी, संगनमताचा गंभीर आरोपही केला होता. हा वाद भाजपाच्या दोन आमदार समर्थकांमध्ये होता. त्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी स्वसंरक्षण म्हणून हेल्मेट घालत असल्याचे सांगितले.