भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सागर म्हस्के यांची फेरनिवड

0
941

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी  सागर म्हस्के यांची नुकतीच फेरनिवड  करण्यात आली. म्हस्के हे चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप,आमदार जगदीश मुळीक, आमदार महेश लांडगे यांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवून माझी पुन्हा भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. हा विश्वास सार्थ ठरवणार असल्याची प्रतिक्रिया म्हस्के यांनी निवडीनंतर व्यक्त केली आहे.