Desh

भाजपा खासदार मनोज तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी

By PCB Author

June 23, 2019

दिल्ली, दि, २३ (पीसीबी) – दिल्लीचे भाजप अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तिवारी यांनी पोलीस स्टेशनला जाऊन धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी दुपारी एक मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आल्याचे तिवारी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

मला एका अज्ञात व्यक्तीने मोबाइलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मनोज तिवारी यांच्या खासगी फोनवर शुक्रवारी दुपारी पावने एकच्या सुमारास ही धमकी देण्यात आली आहे. परंतु, तिवारी यांनी हा मेसेज शनिवारी सायंकाळी पाहिला. त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन रितसर धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याआधीही मनोज तिवारी यांना शनिवारी धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी याचा तपास केला तेव्हा धमकी देणारा आरोपी हा कर्नाटकातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.