भाजपा ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

0
352

सांगवी,दि.२०(पीसीबी) – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर वतीने नवी सांगवी मध्ये भाजपा ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा आमदार योगेश आण्णा टिळेकर, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप,भाजप शहरध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली थोर संत समाजसुधारक गाडगे बाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा पदाधिकारी संपर्क प्रमुख विणा सोनवलकर, भाजप ओबीसी शहर अध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर, सरचिटणीस कैलास सानप, योगेश आकुलवार, नेहुल कुदळे, राजेश डोंगरे, अनिल राऊत प्रसिद्धी प्रमुख ललित म्हसेकर, उपाध्यक्ष शंकर लोंढे, योगेश वाणी, राजेंद्र ढवळे, अमोल शहाणे, सचिन कुदळे, राजेश लोंखडे,विनोद गवळी, सोनु बेहरा, जयंती लाल,अनिल जायभाय उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ललित म्हसेकर यांनी केले.