भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप यांच्या कडून जमीनव्यवहारात मोठी फसवणूक ?

0
1230

पिंपरी चिंचवड, दि. १८ (पीसीबी) -भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप यांनी चेकवर बनावट सही करून सत्तेचा गैरवापर करत जमीन व्यवहारात मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांनी आज पत्रकापरिषदेत केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पवार हे आमदार जगताप यांचे एकेकाळचे खंदे समर्थक समजले होते. पिंपळे गुरव येथील स.न. ८७ हिस्सा नं२ मधील १३० गुंठे जागा अरुण पवार यांनी विकसनासाठी घेतली होती.

त्यापैकी ६२ गुंठे जागा चंद्ररंग डेव्हलपर्स अन्ड बिल्डर्स प्रा. लि. चे संचालक शंकर पाडुरंग जगताप आणि त्यांचे दुसरे बंधू विजय पाडुरंग जगताप यांनी ओम साई कन्स्ट्रक्शनच्या नावे घेतली. या व्यवहारात अरुण पवार यांची सहमती न घेताच परस्पर खरेदी केली गेली. बँकांतील चेकवर देखील आपली बनावट सही केल्याचा गंभीर आरोप अरुण पवार यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली असता राजकीय दबावामुळे पोलिसुध्दा दखल घेत नसल्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भिती पवार यांनी व्यक्त केली आहे. आता या प्रकऱणात मी थेट मानव अधिकार आयोगाकडे दाद मागितली असल्याचेही पवार यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कधीकाळी कट्टर समर्थक मानले जाणारे अरुण पवार यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता … आणि आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या सह ३ जणांवर फसवणूक केली असल्याची तक्रार केली… ते लोक मला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचं पवार यांनी जाहिर पत्रकार परिषदेत म्हटलंय … पवार सांगतात कि.. माजी नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप, विजय पांडुरंग जगताप, अमोल साहेबराव उंद्रे, तुषार दत्तात्रय झेंडे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाचा गैरवापर करून त्याचबरोबर सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल केले आहेत… गेली २० ते २५ वर्ष मराठवाडा जनविकास संघ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारकरी पालखी सोहळ्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याचा उपक्रम मी राबवतो आहे… याशिवाय गेली १० वर्ष वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवीत असून प्रत्येक वर्षी पाच हजार वृक्ष लावून ते वृक्ष जगविण्यासाठी स्वयसेवकाच्या मार्फत काम करत आहोत…, असे अनेक या प्रकऱणी अरुण पवार यांनी अगदी तपशिलवार सर्व हकिकत पत्रकारांना कथन केली. शंकर पांडुरंग जगताप व त्यांच्या नातेवाईकांनी मी विकसनास घेतलेली जमीन करण्यासाठी बोगस स्वाक्षरी, मोजणी, त्याचबरोबर पोलिसांना हाताशी धरून माझे व माझ्या कुटुंबाचे हनन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. या लोकांपासून मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे… असं पवार यांनी वारंवार म्हटलंय … त्यामुळे मी राज्य मानव हक्क आयोग, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांच्याकडे तक्रार केली आहे… मानवी हक्काचे उल्लघन होत असल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे… त्याचबरोबर माझी आर्थिक फसवणूक झाली असल्यामुळे राज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला देखील तक्रार केली आहे…जीवाला धोका असलायने मी आता संरक्षण मागितले आहे…. त्याच बरोबर त्यांनी यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांचा भाचा सचिन कवडे यांच्यावरही आरोप केला आहे … त्यांनी म्हटलं कि सचिन कवडे हा शंकर जगतापांचा भाचा असल्या कारणाने तो वारंवार मला ब्लॅकमेल करतो… माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल करेल असं म्हणायचा … यावेळी अरुण पवार यांनी वाकड पोलीस स्टेशनला या संबंधी अर्ज दिला होता … मात्र राजकीय दबावामुळे चौकशी न करता तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पवार यांनाच उलटी दमदाटी करत ४० लाख रुपये सचिन कवडे ला देऊन टाक नाहीतर तुझ्यावरच गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिली असल्याचं म्हटलंय …