Maharashtra

भाजपात हिम्मत असेल तर उदयनराजेंना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर कराव – अमोल मिटकरी

By PCB Author

September 15, 2019

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपात हिम्मत असेल तर आता उदयनराजेंना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर कराव असे विधान केले आहे.

तसेच ईव्हीएमच्या जोरावर जर तुम्ही सत्तेत आला तर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री उदयनराजे असायला हवेत असेही मिटकरी म्हणाले आहेत. मिटकरी यांच्यासह नवाब मलिक यांनीही उदयनराजेंवर टीका केली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला अशी टीका केली आहे.

तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ‘साहेब उदयनराजेंवर तुम्ही मानापासून प्रेम केले, सातारातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलत. पोटच्या पोरावानी प्रेम केलेत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब काय मिळाले? पण तरीही यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला’ असे ट्वीट करत शरद पवारांना प्रश्न विचारला आहे.