“भाजपातील ७० टक्के आमदार आमचेच”

0
262

मुंबई,दि.२०(पीसीबी) – आजी माजी आमदार हे राष्ट्रवादीत येण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे इच्छा व्यक्त करत असतील मात्र कुणाला पक्षात घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भाजपाचे १० पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हटल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी हे नवं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजपाचे काही नेते, आमदार फुटणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान तीन पक्षांचं सरकार स्थापन झाल्याने तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार सहा महिन्यात जाईल असं भविष्य तुम्ही सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदारांनीही भाजपाला नाकारलं. येत्या चार महिन्यात तुमच्याकडचे किती आमदार आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणारही नाही असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.