भाजपातर्फे जीवनावश्यक साहित्य वाटप

0
426

चिंचवडगाव, दि. ४ (पीसीबी) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे रेशन फळभाज्या किट वाटप कऱण्यात आले. कोरोना काळात लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिंचवडगावां मधील रिक्षा चालक, लेडिज टेलर, शालेय विद्यार्थी ,वाहतुक करणारे चालक, मोलमजुरी आणि घरकाम करण्याऱ्या महिला, हातगाडीवाल्या भगिनी व गरजु लोकांना बुधवारी (दि.३) देऊळमळा पटांगण येथे जीवनावश्यक वस्तूंचे रेशन, फळभाज्या किट वाटप करण्यात आले.

सत्संग फाउंडेशन व भारतीय जनता पक्ष किवळे मंडल अध्यक्ष योगेश सुभाष चिंचवडे, सुनिल लांडगे, राजेश शिरोळे, प्रशांत आगज्ञान,महेश लांडगे यांच्या वतीने किट वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, रा.स्व.संघ चिंचवड गटाचे वस्ती रचना प्रमुख अविनाश आगज्ञान तसेच रविंद्र देशपांडे , अरुण जमंखडी, तुकाराम बेणारे ,नारायण लांडगे, मंगेश शिवले उपस्थित होते .
तसेच चिंचवड गावातील विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.