Pune

भाजपाच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश खुद्द अजितदादांनीच थांबवला

By PCB Author

February 21, 2022

पुणे, दि. २१ (पीसीबी) – महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण बंड करतात, तसेच पक्षाबाबत जाहीर नाराजी व्यक्त करीत असल्याचे आपण आत्तापर्यंत पाहिले आहे. पुण्यात होणा-या महापालिकेच्या तोंडावर भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे समजतंय, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुर्तास पक्षप्रवेश नको अशी भूमिका घेतली आहे. आरक्षण जाहीर झाल्यावर निर्णय घेऊ असं अजित पवारांनी धोरण असल्याने अनेक नगरसेवकांचा पक्षप्रवेश रखडणार आहे. पुण्यात अनेक नगरसेवक आणि भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात येण्यास उत्सुकत असल्याची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. परंतु सध्या अजित पवार सध्या आरक्षण जाहीर होण्याची वाट पाहत असल्याने तुर्तास पक्षप्रवेश लांबणीवर टाकला असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ज्यावेळी आरक्षण जाहीर करण्यात येईल त्यावेळी भाजपचे अजून किती नगरसेवक प्रवेश हे त्यावेळी स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे.

आरक्षणानंतर ठरेल किती नगरसेवक येतील महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक नगरसेवक बंड करण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांना पुढील पाच वर्षासाठी त्यांना चांगला पक्ष हवा आहे, त्यामुळे ते बंड करण्याच्या तयारीत असतात. भाजपचे काही नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी जाहीर केलं आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नगरसेवकांचा पक्षप्रवेश रखडल्याचे समजतंय. पुण्यात होणारी महापालिकेची निवडणुक अत्यंत चुरशीची होईल असं तिथ चर्चा आहे. परंतु कोणत्या पक्षाचं पारड जड आहे हे मात्र निवडणुक संपल्यानंतरचं जाहीर होाईल असं वाटतंय कारण निवडणुकीत कधी कोणता पक्ष बाजी मारेल हे कोणालाही माहित नाही.

राजकीय वातावरण तापलंय महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण किती बिघड हे आपल्याला माहित आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारवरती भाजपच्या अनेक नेत्यांकडून वारंवार आरोप केले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापलं असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातील महापालिकेच्या आवारात किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाल्यापासून हे वातावरण गरम व्हायला सुरूवात झाली. त्यानंतर संजय राऊत यांना धमकीचं पत्र मिळालं अशा घटना महाराष्ट्रात घडत असताना याला महापालिकेच्या निवडणुकीवरती किती परिणाम होईल हे सुध्दा पाहणं गरजेचं आहे. पण अजित पवारांनी आरक्षण झाल्यावर आपण निर्णय घेऊ असं ठरविल्यापासून अनोख्या राजकीय चर्चेला वेग आला आहे.