भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याने दिला राष्ट्रवादीला पाठिंबा  

0
811

सोलापूर, दि. १४ (पीसीबी) – माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपला  मोठा धक्का बसल्याचे मानले जात  आहे. 

माळशिरस   मतदारसंघात स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून केवळ स्वार्थासाठी बाहेरचा उमेदवार लादला गेला आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे, असे धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्याने राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याने माळशिरसमध्ये आता भाजप विरूद्ध राष्ट्रवादी अशी रंगदार लढत होण्याएवजी मोहिते पाटील विरूद्ध मोहिते पाटील, असा सामना रंगणार  आहे.  राष्ट्रवादीतून भाजपमध्ये  गेलेले विजयसिंह मोहिते- पाटील यांनी भाजपची प्रचारयंत्रणा सांभाळली आहे. परंतु धवलसिंह यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.