भाजपमध्ये येण्यास अनेक पक्षांतील मोठे नेते उत्सुक; मुख्यमंत्र्यांचे सुचक विधान  

0
450

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – भाजपमध्ये येण्यास  अनेक पक्षांतील मोठे नेते  उत्सुक  आहेत, असे सुचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज (मंगळवार) येथे केले आहे. लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांची यादी आज (मंगळवारी)किंवा उद्या (बुधवार)  जाहीर होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत पत्रकार परिषदेत फडणवीस बोलताना म्हणाले की, आमच्या पक्षाच्या उमेदवारांबाबत फारसे वादविवाद नाहीत, त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात येईल. काही नावे राहिली आहेत. परंतु एक-दोन दिवसांमध्ये तो प्रश्नदेखील मिटवू.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांवेळी भाजपची देशात मोठी लाट होती. त्याहून मोठी लाट यंदा आहे. अनेक पक्षांचे मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत,असे ते म्हणाले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे. यावर फडणवीस  म्हणाले की, आगे आगे देखो होता है क्या?  असे सूचक विधान केले.