Maharashtra

भाजपमध्ये प्रवेश करताच शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट

By PCB Author

September 15, 2019

सातारा, दि. १५ (पीसीबी) – भाजपमध्ये जाताच सातारच्या दोन्ही राजांमधील वाद मिटला की काय असा प्रश्न सातारकरांना पडला आहे. कारण शिवेंद्रराजे यांनी चक्क उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

शिवेंद्रराजे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा देखील झाल्याचे कळतय. राष्ट्रवादीत असताना उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद टोकाला गेला होता. याच वादातून शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मात्र भाजपमध्ये प्रवेश करताच दोन्ही राजांच्या नात्याला नव वळण मिळालय की काय अशी चर्चा राज्यभरात रंगली आहे.