Maharashtra

भाजपमध्ये जाणार नाही; पण काँग्रेसला नमवणार – अब्दुल सत्तार

By PCB Author

April 04, 2019

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – औरंगाबादमधून लोकसभेची उमेवारी न मिळाल्याने  काँग्रेसमधील नाराज नेते   अब्दुल सत्तार  यांनी मी काँग्रेसमध्येच राहणार आहे,  भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. काँग्रेसविरोधात प्रचार करणार आणि काँग्रेसला नमवणार, असाही निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. 

काँग्रेसमध्ये असलो, तरी मी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहे.  ८ एप्रिल रोजी मी माझा निर्णय घेणार आहे, असे सत्तार यांनी सांगितले. दरम्यान, सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचा खुलासा केला आहे.

सत्तार यांच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी   सत्तार यांचा निर्णय हा आत्मघातकी असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर सत्तार यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवल्यास भाजप-शिवसेनेच्या उमेदवारीला फायदा होण्याची शक्यता आहे.