Maharashtra

भाजपमध्ये जाणार नाही, पण अपक्ष निवडणूक लढवणार – अब्दुल सत्तार

By PCB Author

March 24, 2019

औरंगाबाद, दि. २४ (पीसीबी) – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून  मी अपक्ष म्हणून निवडणूक  लढवणार आहे,  पण  मी भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी केला आहे. यामुळे सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा पडला आहे.

औरंगाबादमधून आमदार  सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज आहेत, मला विश्वासात न घेता  उमेदवारी जाहीर केल्याने सत्तार यांनी  अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री सत्तार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे सत्तार यांच्या भाजप्रवेशाच्या चर्चा रंगल्या  होत्या.

यावर सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने मी भाजपमध्ये जाणार, असे होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु मी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून  अपक्ष म्हणून निवडणूक  लढवणार आहे,असा पुनरूच्चार त्यांनी केला.