भाजपने स्वतंत्र लढून बघाव, ६०-६५ वर जागा मिळणार नाहीत – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

0
221

पंढरपूर, दि. १४ (पीसीबी) – भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघाव, राज्यात त्यांना 60-65 जागावरच समाधान मानावे लागेल”, असं जयंत पाटील म्हणाले. नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढून, आपली ताकद दाखवावी असं आव्हान दिलं होतं. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. “भाजपनेही स्वतंत्र लढावं, त्यांना केवळ 60 ते 65 जागाच मिळतील, त्यापेक्षा जास्त जागा ते जिंकू शकणार नाहीत”, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

पक्षाच्या बैठकीसाठी त्यांनी पंढरपूर दौरा केला. यावेळी ते बोलताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला.

यावेळी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या वीज बिल वाढीविरोधातील आंदोलनाबाबत विचारण्यात आलं. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. वीज बिलाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल”

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. शरद पवारांच्या सामनातील मुलाखतीवरुन चंद्रकांत पाटील यांनी हे भाष्य केलं. यावेळी त्यांनी निवडणुका लागतील तेव्हा चारही पक्षांनी स्वतंत्र लढून आपला जनाधार दाखवून देऊ असं आव्हानही पवारांना दिलं.

“तुम्ही वेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत.” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.