भाजपने साध्वीची पक्षातून हकालपट्टी करावी – नितीशकुमार

0
411

पाटणा, दि. १९ (पीसीबी) – महात्मा गांधीजींबाबत अशाप्रकारची विधान कधीच स्वीकारली जाणार नाहीत, साध्वीचे वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची हा भाजप अंतर्गत प्रश्न आहे, पण साध्वीची पक्षातून हकालपट्टी करण्याचा भाजपने विचार करावा, असे  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी  म्हटले   आहे.

पाटणामध्ये मतदानानंतर पत्रकारांशी नितीशकुमार बोलत होते.  इतक्या दीर्घकाळ लोकसभा निवडणुका होऊ नयेत, असेही मत नितीशकुमार यांनी यावेळी व्यक्त केले आहे. याशिवाय आपण अशा तऱ्हेची वक्तव्ये सहन करू शकत नाही, असा सूचक इशाराही नितीश कुमार यांनी भाजपला दिला आहे.  त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा विचार व्हायला हवा,  असे ते म्हणाले.

दरम्यान, महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता आणि यापुढे राहील, असे वादग्रस्त विधान  मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदासंघाच्या भाजपच्या  उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनीही नाराजी व्यक्त करून साध्वींना माफ केले जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.