Notifications

भाजपने पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापले; गिरीश बापट यांना उमेदवारी

By PCB Author

March 13, 2019

पुणे, दि. १३ (पीसीबी) – भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी आणि जालना लोकसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाहिली यादी तयार केली आहे. ती येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील सात मतदारसंघांचा समावेश असेल, असे सूत्रांनी सांगितले.