Maharashtra

भाजपने काँग्रेसच्या ‘या’ दोन आमदारांना प्रवेश नाकारला

By PCB Author

September 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश दिला असला तरी, आता त्यांनी नेत्यांना प्रवेशबंद केल्याचे दिसून येत आहे. कारण पक्षांतर करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसच्या दोन आमदारांना भाजपने प्रवेश नाकारल्याने  या  आमदारांची  चांगलीच गोची झाली आहे.

या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश  करण्यासंदर्भात बैठका घेऊन  कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. पण आता त्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके अशी या आमदारांची नावे आहेत.  या दोघांना प्रवेश देण्यास भाजपने नकार दिला आहे.

अक्कलकोटमध्ये स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना नाराज न करण्याचे धोरण भाजप श्रेष्ठींनी घेतले आहे. तर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर परिचारक गट दुखावू शकतो. त्यामुळे   भाजपने या दोन आमदारांचा  प्रवेश नाकारला आहे.  त्यामुळे या दोन्ही आमदारांची कोंडी झाली आहे.