भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटीलांची फेरनिवड

0
289

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनी फेरनिवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा होत होती. भाजप नेतृत्ताने चंद्रकांत पाटलांवर पुन्हा विश्वास दाखवल्याचे दिसत आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी  अनेकांची नावे चर्चेत होती. प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे अशी मोठी नावे चर्चेत होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे असल्याने त्यांचीच निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

भाजप नेतृत्ताने चंद्रकांत पाटलांवर पुन्हा विश्वास ठेवत भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.