Banner News

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती

By PCB Author

July 16, 2019

मुंबई, दि,१६ (पीसीबी) – रावसाहेब दानवे यांनी भाजपा प्रदेशध्यक्षा पदाचा राजीनामा दिल्यानंतर, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची घोषणा केली. 

भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी आजच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्यमंत्रिपदाचा भार आहे. ते ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. या शर्यतीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनाच पसंती होती. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले.