भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीतून एकनाथ खडसेंना डच्चू; गिरीश महाजनांची वर्णी

0
419

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना निवडणूक व्यवस्थापनाच्या मुख्य समितीतून डच्चू देण्यात आला असून त्यांच्या जागी गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आली आहे. राज्यातील उमेदवारांच्या निवडीवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. नेहमी मुख्य समितीत स्थान असणाऱ्या खडसेंना या समितीत स्थान नसल्याने ते बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, विशेष संपर्क अभियान समितीत प्रकाश मेहता व शायना एनसी यांच्यासोबत एकनाथ खडसेंना स्थान देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत राज्यातील १७ जागांवरील उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली. ही चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात असून दोन दिवसांनंतर लोकसभा उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.