भाजपच्या तिसऱ्या यादीत खडसे, तावडे, बावनकुळे, पुरोहित, मेहतांची नांवे नाहीत

0
472

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी भाजपने आज ( गुरुवारी) संध्याकाळी जाहीर केली. या यादीत केवळ ४ उमेदवारांचीच नावे जाहीर करण्यात आले आहेत. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचे नाव या यादीतही नाही. त्यामुळे खडसेचा पत्ता भाजपने कट केल्याचे स्पष्ट होत आहे.

तिसऱ्या यादीत शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जून रेड्डी, साकोलीतून परिणय फुके तर मालाड पश्चिम मतदारसंघातून रमेश ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, अद्याप तीन जागांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यातच उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने आज रात्री उशीरापर्यंत पुढची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित आणि प्रकाश मेहता यांचीही नावे या यादीत नसल्याने या नेत्यांचा भाजपने पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचंही तिसऱ्या यादीत नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.