Pimpri

भाजपच्या जुन्या सहा कार्यकर्त्यांची उपाध्यक्षपदी निवड; शहराध्यक्ष जगताप यांनी दिले नियुक्तीपत्र

By PCB Author

February 22, 2019

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहर संघटनेच्या कार्यकारिणीवर जुन्या सहा कार्यकर्त्यांना संधी दिली. या सहा जणांची पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र आमदार जगताप यांनी दिले.

नंदू भोगले, गणेश चव्हाण, संतोष घुले, द्वारकादास कुलकर्णी, रवींद्र नांदूरकर आणि दत्तात्रय कोरडे या सहा जणांची भाजपच्या शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयात या सहा जणांना त्यांनी नियुक्तीचे पत्र दिले.