Maharashtra

भाजपच्या काळात बुलेट ट्रेनच्या गतीने विकास, आता गाडी रुळावरुन घसरली – सुरेश हाळवणकर

By PCB Author

January 19, 2020

मुंबई,दि.१९(पीसीबी) – बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जाणारा महाराष्ट्र रुळावरून घसरला आहे, असं म्हणत भाजप नेते आणि आमदार सुरेश हाळवणकर यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊन ५० दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरेश हाळवणकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

तिघांच्या संगनमतात विकासाचा गाडा रुतला, महाभकास आघाडीच्या खातेवाटपात अडकला, विकास म्हणजे काय ते आता महाराष्ट्र आठवू लागला, असं काहीसं काव्यात्मक ट्विट करत हाळवणकर यांनी बोचरी टीका केली आहे.

बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जाणारा महाराष्ट्र रुळावरून घसरला,
तिघांच्या संगनमतात विकासाचा गाडा रुतला,
महाभकास आघाडीच्या खातेवाटपात अडकला,
विकास म्हणजे काय ते आता महाराष्ट्र आठवू लागला#50MahaDarkDays

— Suresh Halwankar (@SureshHalwankar) January 19, 2020

महाविकास आघाडी सरकारने ५० दिवस पूर्ण केले आहेत, मात्र या तिघांच्या संगनमतात विकासाचा गाडा रुतला आहे. त्यामुळे विकास म्हणजे काय असते ते आता महाराष्ट्र आठवू लागला आहे, असं म्हणत हाळवणकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.