“भाजपच्या काळातले अपूर्ण प्रकल्प तात्काळ पूर्ण करा”

0
344

नाशिक,दि.११(पीसीबी) – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपच्या काळात मंजूर झालेले पण अर्धवट राहिलेले प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

गंगापूर धरणावर बांधलेलं बोट क्लब, कलाग्राम, एसटीडीसीचे निवास कक्ष, मनोरंजन पार्क, फाळके स्मारक या आणि अनेक अडगळीत प्रकल्पांना पूर्ण करण्याचे आदेश भुजबळांनी दिले असल्याचं कळतंय

दरम्यान, भुजबळांनी मनसेच्या काळात शहरात उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचीही पाहणी केली. प्रकल्पांची देखभाल करण्याचे आदेश द्यावेत यासाठी मनसेचे पदाधिकारी भुजबळांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळतेय.